रोनाल्डो आणि धर्मसंकट

जगभरातील करोडो फुटबॉल प्रेमींच्या गळ्यातील ताईत असणारा आंतराष्ट्रीय फुबॉलपटू आणि वाद हा सद्ध्या जगभरात चर्चेचा होतोय ..त्याला अनेक कंगोरे आहेत कारण आहेत …त्यातील पहिली ख्रिस्तीयानो रोनाल्डो ने मँचेस्टर सोडून आशियातील सौदीच्या “अल नासर” या क्लबशी केलेला रेकॉर्डब्रेक करार दुसरी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी रोनाल्डोने पॅलेस्टाईला दिलेले कथित समर्थन मग राजकारणाला इथूनच सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद हे आंतरराष्ट्रीय राजकारनापासून ते क्रीडा विश्वापर्यंतठळकपणे उमटले. काही दिवसांपूर्वी “जुव्हेंट ‘क्लब ला अलविदा करत तो आपल्या जुन्या क्लब मध्ये सामील झाला खरा पण क्लब च्या मुख्य प्रशिक्षकाशी त्याचं काही जमलं नाही रोनाल्डो हटकून वागतो हा त्याचा आरोप होता ..ही गोष्ट त्याने कतार विषवचषकदरम्यान एका मेगेझीनला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये संगीतली आणि मी क्लबशी सोबत पुढे नसेल हे देखिल स्पष्ट केले …आणि प्रकरणाला इथून सुरवात झाली .. रोनाल्डो ने मँचेस्टर युनायटेड शी आपला करार संपुष्टात आणला . .पण कथित पॅलेस्टाईन संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विषय पुन्हा वर आला व युरोप मधील एकाही क्लबने त्याला आपल्या संघात सामावून घेण्यासाठी नकार दिला ..याला इस्राईल च्या तरबेज परराष्ट्र धोरणाची किनार होती असं म्हटलं जातं .. पूढे जाऊन त्याला विषवचषका दरम्यान निर्णायक सामन्यांमध्ये राखीव ठेवण्यात आलं …प्रसंगी उपांत्यपूर्व फेरीमध्ये निर्णायक क्षणीं बाकावर बसवलं …प्रश्न पडतो की जबरदस्त क्षमतेसह वेळ प्रसंगी सामना एक ko फिरवणारा हा स्टार फुटबॉलपटू सोबत अस होऊ कसं शकतं ..पण या विषयाची धोरण ही आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग झाली होती …आणि कुणी एका शक्ती ने पडद्याआड सूत्रं हलवली आणि C र7 रोनाल्डो ला चितपट केलं ..अगदी आपल्या स्फोटक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे तुर्कस्तान चे अध्यक्ष “रिसेप त्ययब एर्दोगोन ” यांनी तर म्हटले की हा तर रोनाल्डो वर झालेला अन्याय आहे याला मग आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटा वर आणून नव्या समीकरनाची दिशा स्पष्ट केली पण मुद्दा इथं पुन्हा तोच येतो की खेळाला राजकारनात आणुन साध्य करायचं काय पण याची उत्तर भविष्यात दडलेली आहेत – महेश वाधवणे







दिलेले कथित समर्थन

By:

Posted in:


Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started