पुनवडी ते पुणे

पुणे शहर आपल्या दोन दशकांच्या प्रवासात मोठया विस्ताराने वाढलं ….दोन महानगरपालिका , कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पीएमआरडीए असं मोठं वलय लाभलेलं पुणे शहर खूप कमी कालावधीत देशातील वेगानं वाढणार महानगर म्हणून उदयास आलं …वाढती लोकसंख्या आणि मानवी गरजा या दोन्ही मूलभूत गोष्टी त्याच बरोबर “देशाची शैक्षणिक राजधानी” आणि माहेरघर गेल्या दशकात उदयास आलेली “आयटी” क्षेत्र ते आयटी हब म्हणून देशभर लौकिक असलेलं पुणें महानगर आपल्या वाढत्या विस्तारा बरोबरच अर्थक्रांतीच पाऊल घेऊनच पुढं जात असतांना शहराच्या लगत असणारी गाव ही सुद्धा गेल्या दशकात भरभराटीला आली उत्पन्नाचा स्रोत वाढला तसेच जागेचा सदनिकेच्या मागण्या वाढतं चालल्या तसे तसे पुणे शहर भारताच्या नकाशावर ठळक स्थान निर्माण करत गेलं …याला जोड आहे ती महत्वाकांक्षी राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणांच्या सक्षमीकरनाची …आणि …परिपूर्ण योगदानाची यात उल्लेखनीय नाव म्हणजे आणि ” भुगाव” शहराच्या पश्चिमेला वसलेलं हे गाव उदयास आलं ते आपल्या पारंपरिक खेळ आणि स्पर्धा मुळे “२०१७”ची “महाराष्ट्र केसरी “स्पर्धा म्हणून भुगावची ओळख देशभरात प्रसिद्ध आहे .आणि समाजकारण म्हणून येथील आयोजकांनी ती यशस्वी करून दाखवली असंच “पुनवडी”पासून सुरू झालेल ” पुणे ” शहर आणि महानगर आज देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावत आहे. “भुगाव” या ऐतिहासिक परंपरा असलेल्या आणि कलचक्रा प्रमाणे वाढत चाललेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा या “माहीती पट” लिहिण्याच्या योगानें घेता आला इतिहास प्रत्यक्ष आधुनिक तंत्रज्ञाना च्या माध्यमातून प्रोडक्शन टीमला सादर करताना शहरातील अनेक नामवंत क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींनी मार्गदर्शन केले आणि आपले अनुभव जोडण्यात मदत केली आणि सुंदर असे भुगाव महितीपटावर उमटले . माहितीपट लेखक – महेश वाधवणे निर्माता -रोह प्रोडक्शन

“भुगाव पुणे”

By:


Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started